पुरंदर मध्ये संभाजीराव झेंड्यांसाठी पोषक वातावरण ; युवा वर्गात झेंड्यांची मोठी क्रेझ आजी-माजी पेक्षा संभाजींना जास्त पसंती…

प्रतिनिधी  द.महाराष्ट्र न्यूज

पुंरदरमध्ये संभाजीराव झेंडेंसाठी पोषक वातावरण; युवावर्गात झेंडेंची मोठी क्रेज, आजी-माजी पेक्षा संभाजीला जास्त पसंती

पुरंंदर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठा राजकीय सामाना रंगताना पाहिला मिळत आहे. उमेदवार रणांगणात उतरले असून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. युतीकडून विजय शिवतारे आणि आघाडीकडून संजय जगताप यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी देखील कंबर कसली असून, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांना राष्ट्रवादीकडून एबी फॅार्म दिल्याने युतीचा उमेदवार नक्की कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही राजकीय जाणकारांनुसार या मतदार संघात युतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४ तारेखनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. सध्या पुरंदरमध्ये संभाजीराव झेंंडे यांच्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

 

केलेल्या कामांचा गाजावाजा नाही

 

मूळात पुरंदरमध्ये संजय जगताप आणि विजय शिवतारे यांच्यात लढत होणार असल्याचे मानले जात होते. पण संभाजीराव झेंडे यांच्यामुळे तिसरा पर्याय देखील

मतदारांना मिळाला आहे. तसेच संभाजीराव झेंडे यांनी शासनाच्या विविध पदांवर काम केल्याने त्यांच्याकडे प्रशासनातील कामांचा दांडगा अनुभव पाठीशी आहे.

दुष्काळग्रस्त भागातील अनेकांना त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. केलेल्या मदतीचा कोणताही गाजावाजा कधी झेंडे यांनी केला नाही. जे काही केले ते सर्व सढळ हाताने केले आहे. तालुक्यातील विविध

भागात चारा छावण्या त्यांनी उभ्या केल्या. शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने मदत करता येईल, यासाठी प्रयत्न केले.

नागरी सुविधामध्ये रस्ते, पाणी, ड्रिनेज आदी गोष्टी जातीने लक्ष घालून त्या मार्गी लावल्या. यामुळे विकासाचं एकच नाव संभाजीराव, अशा गर्जना तालुक्यातील तरुणांकडून दिल्या जात आहे.

 

आजी माजीपेक्षा संभाजीला पसंती

 

तालुक्याचे नेतृत्व विजय शिवतारे यांनी १० वर्ष केले. तेथून पुढे म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत संजय जगताप यांना पुरंदरकरांनी संधी दिली. मात्र, सध्याच्या घडीला तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रस्थापित

नेत्यांविरोधात रोष पाहिला मिळत आहे. संभाजीराव झेंडे यांच्याकडे येथील नागरिक नवा चेहरा म्हणून पाहत आहेत. त्यांच्या बद्दल सकारात्मक प्रतिसाद

नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. लोकसभेनंतर झेंडेंनी तालुक्यात अनेक भागांना भेटी दिल्या. खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या तयारीला ते

केव्हाच लागले होते. त्यांनी त्यासाठी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवलेली आहे. तालुक्यातील अनेक प्रश्नांबाबतची

माहिती त्यांच्याकडे आहे. ते सोडविण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे याची देखील इत्थंभुत माहिती त्यांच्याजवळ आहे. ते स्वःताह रिटायर्ड मा. कलेक्टर असल्याने त्यांनी या सर्व प्रोसेसमधील खाच खळगे माहिती आहेत.

 

पुरंदरकरांची साथ मोलाची

तालुक्यातील तरुणांध्ये संभाजीराव झेंडेबद्दल मोठी क्रेज पाहिला मिळत आहे. झेंडेंनी ज्यावेळी उमेदवारीचा अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला होता त्यावेळी मोठ्या संख्येने युवावर्ग त्यांच्या रॅलेत सहभागी झाला

होता. तरुणांमध्ये परिवर्तनाची लाट असून, त्यासाठी झेंडे यांच्या शिवाय दुसरा कोणत्याच पर्याय नसल्याची भावना युवावर्ग व्यक्त करीत आहे. महिलांमध्ये देखील एक

प्रकारचा उत्साह पाहिला मिळत आहे. संभाजीराव झेंडे यांनी आजवर अनेक काम केलेली आहेत, पण त्या कामांचे श्रेय कधीही घेतले नाही. हा त्यांच्या जवळ असणारा मनाचा मोठेपणा आहे दुष्काळ सदृश्य

परिस्थितीत चारा छावणी शिक्षण महिला सबलीकरण शेतीवर अनेक प्रयोग रोजगार निर्मिती विकास कामे

धार्मिक स्थळांचा जीर्णद्वार त्यांनी केला आहे. अशी एक ना अनेक कामे त्यांनी पुर्नत्वास नेली आहेत. पुरंदरकरांची साथ त्यांना भेटल्यावर तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page