पुरंदर विधानसेचा राष्ट्रवादी काँँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; जुन्या योजनांला उभारी देण्याचा तर काही नव्या संकल्पनाची सांगड घालण्याचा वादा ….
प्रतिनिधी द. महाराष्ट्र
पुरंदर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांनी पुरंदर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात अद्यावत आरोग्य सुविधा सर्वांगीण शिक्षणाची पायाभरणी, दर्जदार सस्ते व पायाभूत सुविधा, शेती व शेतकऱ्यांचा विकास, सामाजिक
विकास, महिलांसाठी स्वयंमरोजगार, तरुणांसाठी रोजगार आदी गोष्टींवर भर देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी
राज्यासाठीचा जाहीरनामा मुंबई येथून प्रसिद्ध केला. त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या
उमेदवारांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
गुंजवणीचे हक्काचे पाणी आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार
पुरंदर तालुका हा खरंतर दुष्काळग्रस्त तालुका म्हणून शासनाने जाहीर केला होता. दर ४ ते ५ वर्षांनी
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. एप्रिल आणि मे महिन्यात दुष्काळाची जळ अधिक तीव्र स्वरुपाची असते. बळीराजा अशरक्ष मेटाकुटीला
येतो. यामुळे गुंजवणी धरणाचे २.२ टीमीसी हक्काचे पाणी आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराव झेंडे यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील
तरुण हा खूप हुशार असून, शासकीय नोकऱ्यांमध्ये आणि आयटी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या भागातील तरूण नोकरी करीत आहेत. मात्र, सगळ्यांचा
नोकरी मिळते असे नाही. काहीजण व्यावसायाकडे वळतात. त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले.
जेजुरी एमआयडीसी फेज २ ची संकल्पना, नाझरे
धरणाच्या पाणी पातळीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार
जेजुरी एमआयडीसीमध्ये आजमितीला १५ हजारांहून अधिक नोकरदार काम करीत आहेत. एमआयडीसीच्या
विस्तारीकरणासाठी जेजुरी एमआयडीसी फेज २ विचार आहे. यामुळे या भागातील तरुणांना आणखी नोकऱ्या
उपलब्ध होतील. या विस्तारीकरणासाठी राख न्हावळी या पट्ट्यातील जरायती भागातील जागा पाहिली
असल्याचे झेंडे यांनी सांगितले आहे. जेजुरी येथील नाझरे धरणातील खोलीकरण करणे अत्याश्यक आहे, याचे कारण म्हणजे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ आहे
तो गाळ काढणे गरजेजे आहे. या धरणातून एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. यामुळे या
धरणातील क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दुष्काळच्या परिस्थितीमध्ये विसर्ग होणाऱ्या धरणातील पाण्याचा वापराबाबत मांडली नवी संकल्पना
तालुक्यात जी धरणे आहेत, पाऊसाळ्याच्या दिवसांमध्ये ही धरणे भरतात आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जातो. या धरणातील विसर्ग होणारे पाणी
जॅकवेलच्या माध्यमातून जेजुरीच्या पश्चिम भागात
त्यानंतर खळदच्या पूर्व भागात, शिवरी आदी भागात तळे उभारुण त्यामध्ये सोडले तर त्याचा निश्चित फायदा होऊन दुष्काळाची तीव्रता कमी होण्यासा मदत होईल.
अशा प्रकारचे अनेक गोष्टी या जाहीरनाम्यात सांगण्यात आल्या आहेत. संधी दिली तर याची पूर्तता करणार
असल्याची ग्वाही संभाजीराव झेंडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.