शरद पवार मोदी सरकारवर संतापले काय म्हणाले ते पहा
या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही
पुलवामातील ४० जवानांची हत्या : शरद पवार
नाशिक जिल्ह्यात गारपिटीचा हा……हा…..कार,
सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही
सासवड (प्रतिनिधी) देशांमध्ये शेतकरी वर्ग हा अस्वस्थ आहे मि एका कार्यक्रमा निमित्ताने मध्यप्रदेश मध्ये गेलो होतो. तेथे सोयाबीन, कपाशीचे पीक होते. या ठिकाणी अतिवृष्टी झाली गारा पडल्या सोन्यासारखे हातात आलेले पीक उध्वस्त झाले त्या शेतकऱ्याला आता संस्कार कसा करायचा याची चिंता पडली होती. यामुळे दोन
शेतकऱ्यांनी आत्महत्या केली संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी ही सरकारची असते. नाशिक जिल्ह्यामध्ये गारपिटीने कांद्या व द्राक्षाचे उध्वस्त झाली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये गारपिटीने हा हा कार झाला
आहे.तर काश्मीरमधील पुलवामा मध्ये 40 भारतीय जवानांचे हत्या करण्यात आली व आपला उद्देश साध्य करून घेतला असल्याचा घाणाघाती आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भाजपवर केला.
सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळावर शेतकरी व युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बोलत होते यावेळी पवार पुढे म्हणाले पंधरा
दिवसांपूर्वी मी विदर्भामध्ये होतो. सोयाबीन आणि कापसाचे पीक
पूर्वपणे उद्ध्वस्त झाली आहे सरकारने सांगितले पंचनामे करून परंतु आज उद्यापर्यंत पंचमी झाले नाहीत मदतीचा पत्ता नाही दुसऱ्या बाजूने शेतीमालाच्या किमती पडलेले आहेत एका बाजूला निर्यात बंदी घातली आहे. तर दुसऱ्या बाजूला परदेशातून मला आयात केला जात आहे.
त्याचा परिणाम शेतीमालाच्या बाजारपेठेवर झालाय याची पूर्ण जबाबदारी भाजप सरकारवर आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही त्या सरकारला सत्तेवर बसण्याचा कोणताही अधिकार
नाही. देशावर बेकारीचे संकट आहे. येणाऱ्या निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाच्या असून या निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राणे गरजेचे आहे. असे पवार म्हणाले
पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्याचे काम शरद पवारांनी केले. पक्षासाठी छोटे छोटे कार्यकर्ते देखील महत्त्वाचे आहेत. सत्तांतर करायचे असेल तर मतांतर करावे लागेल शेतकऱ्यांना जाहीर केलेली
कर्जमाफी अद्याप पर्यंत मिळालेली नाही. तर या सरकारने आटी शर्तींची कर्जमाफी केली. असल्याचे माजी सनदी अधिकारी
संभाजीराव झेंडे यांनी यावेळी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक अध्यक्ष महबूब शेख यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत या मोदी सरकार पंधरा लाख रुपये खात्यावर जमा करणार होते ते जमा झाले नाहीत. तर या भाजप
सरकारने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, यांच्या मुलीची काय अवस्था केली? तर एकनाथ खडसे यांचे देखील काय अवस्था केली होती? आपण पाहिले आहे. भाजपाच्या विरोधात बोलत असेल तर ईडी कडून नोटीस बजावली जाते आसा घाणाघात शेख यांनी केला.
यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक अध्यक्ष महबूब शेख, डॉ दिगंबर दुर्गाडे, प्रदीप गारडकर सचिन घोटघुले, विजय कोलते, भरत झांबरे, चेतन मेमाने, ईश्वर बागमार बंडूकाका जगताप उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी तर सूत्रसंचालन जितेंद्र देवकर व आभार पुष्कराज जाधव यांनी मानले….